मुख्यमंत्र्यांना झोप लागते जेव्हा नेटकऱ्यांना टीकेला वाव मिळतो तेव्हा..

झोपेचे महत्त्व आरोग्यासाठी अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. मात्र, याच दिवशी मोठा गदारोळ झाला आहे. हास्यास्पद म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक झोपलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

    मुंबई : निरोगी आरोग्यासाठी व्यायाम, आहार आणि पुरेशा प्रमाणात झोप ही खूप महत्त्वाची गोष्ट समजली जाते. कारण शास्त्रज्ञांनी विविध अभ्यासातून झोपेचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच (शुक्रवार) जागतिक निद्रा दिवस होता.

    झोपेचे महत्त्व आरोग्यासाठी अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. मात्र, याच दिवशी मोठा गदारोळ झाला आहे. हास्यास्पद म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक झोपलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

    तृप्ती गर्ग यांनी जागतिक निद्रा दिवस म्हणून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांचा सभागृहात झोपलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे निद्रा अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो खरा आहे की खोटा ? यावर देखील अनेक शंका उपस्थित होत आहेत.