मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनाही कोरोना संसर्ग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना ( Rashmi Thackeray) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन  आहेत.

    मुंबईः राज्यात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातच कोरोना संसर्ग थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरकाव केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना ( Rashmi Thackeray) कोरोनाचा संसर्ग (Corona Positive)झाल्याचे समोर आले आहे. रश्मी ठाकरे  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन  आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.

    गेल्या काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही  “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्विट करत  कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती.

    आदित्य ठाकरे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक लोकांना भेट दिली. अनेक विकास कामांचे उद्घाटन त्यांनी केले. याशिवाय सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली. मात्र, हे सर्व काम करत असताना ते कदाचित कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले असावेत त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.