Co-operation Minister Balasaheb Patil's big revelation about Mumbai Bank's inquiry

राज्य सरकारकडून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची मुंबई बँकेच्या चौकशी साठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले आहेत. मात्र सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यानी यावर सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण देत यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    मुंबई : राज्य सरकारकडून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची मुंबई बँकेच्या चौकशी साठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले आहेत. मात्र सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यानी यावर सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण देत यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    तक्रार आल्याने चौकशीचे आदेश

    मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारने बँकेची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. मात्र सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यानी यावर सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण देत यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबै बँके संदर्भात तक्रार आल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत एवढीच गोष्ट आहे, असे पाटील म्हणाले.

    राजकीय सूडबुद्धीने कारवाई नाही

    माध्यमांना प्रतिक्रिया देताना सहकार मंत्री म्हणाले की, विभागाकडे अनेक तक्रारी येत असतात, त्यांची प्राथमिक चौकशी करून तपास केला जातो. अशीच एक तक्रार मुंबई बँके संदर्भात आली होती. यावर जी चौकशी समिती गठित करण्यात आली होती तिने जो अहवाल दिला त्या अनुषंगाने राज्याच्या सहकार विभागाने ही कारवाई केली आहे. कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित अशी ही कारवाई नाही, असे सहकारमंत्री पाटील म्हणाले.