भाजपात या, आमदार म्हणून निवडून आणू; शिवसेनेच्या आमदाराला निलेश राणेंची खुली ऑफर

शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे”, असे ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई : नाणार प्रकल्पावरुन चांगलाच राजकारण सुरु आहे. या वादात आता भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनीही उडी घेतली.  यावरुन लिलेश राणे यांनी शिवसेनेच्या एका आमदाराला भाजपात येण्याची खुली ऑफरच दिली आहे.

नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असं वक्तव्य शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केलं होतं. ही शिवसेनेची भूमिका नाही. मी केवळ स्थानिक ग्रामस्थांची भूमिका मांडली, असं म्हणत साळवी यांनी या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा असून ९० टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारला असल्याचेही ते म्हणाले.
यावरुन निलेश राणे यांनी एक ट्विट करत साळवी यांना भाजपाकडून आमदारपदाची खुली ऑफर दिली.