दिलासादायक! मुंबईत गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांची सख्या बाधितांपेक्षा अधिक, काल 13 हजार 702 कोरोना रूग्णांची नोंद

मुंबईत गुरुवारी दिवसभरात 13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 20 हजार 849 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्के झाला आहे. तर डबलिंग रेट 36 दिवसांवर गेला आहे. त्यामुळं मागील दिवसांच्या तुलनेत कालची रुग्णसंख्या कमी असून, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

    मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे मुंबईत गुरावारी पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरात 13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 20 हजार 849 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्के झाला आहे. तर डबलिंग रेट 36 दिवसांवर गेला आहे. त्यामुळं मागील दिवसांच्या तुलनेत कालची रुग्णसंख्या कमी असून, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

    मुंबईत गुरुवारी दिवसभरात 13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 871 रूग्णांना रूग्णालयात दाखल कऱम्यात आलं आहे. मुंबईल्या विविध रूग्णालयं आणि कोव्हिड सेंटरमध्ये जे बेड आहेत ते आज घडीला 17.3 टक्के भरले आहेत. मुंबईतल्या झोपडपट्टी आणि चाळी यामधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 0 झाली आहे. तर 61 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेत जे रुग्ण सध्या कोरोनाबाधित आढळत आहेत, त्यांच्यावर उपचार होऊन ते, आठवड्याभरातच रुग्णालयातून बाहेर येतायेत, त्यामुळं काळजी करण्याचे कारण नाहीय.

    मागील काही दिवसांचा मुंबईतील कोरना रुग्णांचा विचार करता, मुंबईत 6 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्यातला रूग्णवाढीचा दर 1.85 टक्के इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत आज दिवसभरात पाच रूग्णांची नोंद झाली आहे. या पाच रूग्णांपैकी 1 रूग्ण महिला होती तर पाच रूग्ण पुरूष होते. या सगळ्या रूग्णांचं वय 60 वर्षे आणि त्यावरच्या वयाचे होते. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16426 मृत्यू झाले आहेत. आज दिवसभरात मुंबईत 63 हजार 31 चाचण्या झाल्या, त्यापैकी 13 हजार 702 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पण उपचार लवकर होत असून, रुग्णांना आठवड्याभरातच डिस्चार्ज दिला जात आहे.