सर्वसामान्यांसाठी लोकलची अद्यापही प्रतिक्षाच, खोट्या ओळखपत्रावर प्रवास करणं भोवलं; भुर्दंडाचा आकडा पाहून तुम्हीही म्हणाल वाट पाहीन पण बसनेच जाईन

गेल्या एप्रिलपासूनच राज्य सरकारने मुंबईतल्या लोकलने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याने काम-धंद्यासाठी लोकं घराबाहेर पडत आहेत. म्हणूनच मुंबईच्या जीवनवाहिनीत अवैध प्रवाशांची संख्या वाढते आहे.

  मुंबई : कोरोना (Corona) ची दुसरी लाट (Second Wave) शमते आहे. तरीही सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल ट्रेन (Local Train) मधून प्रवास करण्याची मुभा द्यायची रिस्क सरकार घ्यायला अजूनही धजावत नाहीये. असं म्हटलं जातंय की, तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता असल्याने मुंबईत लोकलने प्रवास करण्यसाठी सर्वसामान्यांना अद्यापही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. यादरम्यान मुंबई आणि उपनगरात अनलॉक (Unlock) नंतर खोटी ओळखपत्रे (Fake ID) तयार करून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे.

  गेल्या एप्रिलपासूनच राज्य सरकारने मुंबईतल्या लोकलने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याने काम-धंद्यासाठी लोकं घराबाहेर पडत आहेत. म्हणूनच मुंबईच्या जीवनवाहिनीत अवैध प्रवाशांची संख्या वाढते आहे.

  दररोज बनावट ओळखपत्रांची ६५-७० प्रकरणे

  मध्य रेल्वेत बनावट ओळखपत्रे किंवा विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते आहे. गेल्या ५० दिवसांत ३००० हून अधिक बनावट ओळखपत्रांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवासादरम्यान ताब्यात घेतले आहे. अशाप्रकारे दररोज सरासरी ६५-७० जण बनावट ओळखपत्रासह लोकल प्रवास करताना आढळून आले असून रेल्वे प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले आहे. या खोट्या ओळखपत्र धारकांकडून रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली १५ लाखांहून अधिक रक्कम दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर बनावट ओळखपत्रावर प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.

  ५०० रुपयांत विकत मिळतात बनावट ओळखपत्रे

  असंही म्हटलं जात आहे की, खासगी रुग्णालये, सुरक्षा आणि औषध एजन्सीज एवढेच नाही तर सरकारी कार्यालयांचीही बनावट ओळखपत्रे तयार करून घेत लोक लोकलप्रवासाला प्राधान्य देत आहेत. ही बनावट ओळखपत्रे अवघ्या ५०० रुपयांना विकत मिळत आहेत. कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, मीरा रोड, वसई, मुंब्रा, उल्हासनगर आणि मुंबईतल्या काही ठिकाणी ५०० रुपये घेऊन बनावट ओळखपत्रे दिली जातात.

  लोकल प्रवास झालाय सक्तीचा

  मुंबई आणि उपनगरात काही अटींसह अनलॉकच्या परिस्थितीतही मोठ्या संख्येने काम-धंद्यासाठी लोकं घराबाहेर पडत आहेत. अशातच त्यांच्यासाठी लोकलप्रवास हाच त्यांच्यासाठी एकमेव स्वस्त आणि सुलभ पर्याय आहे. म्हणूनच मोठ्या संख्येने लोकं विनातिकिट किंवा बनावट ओळखपत्राच्या आधारे नाईलाजास्तव प्रवास करत आहेत.

  पकडल्यानंतर ५०० रुपयांचा दंड भरून ते स्वत:ची सुटकाही करून घेतात. उपनगरांत राहणाऱ्या मोठ्या कामगारवर्गाचे म्हणणे आहे की, अशा काळातच लोकलमध्ये अवैधरित्या प्रवास करण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्यायच उरलेला नाही. मोठ्या संख्येने लोकांची दुकाने, कंपन्या इत्यादी कामकाज मुंबईत सुरू झालं असून ते उपनगरांमध्ये राहतात. म्हणूनच सर्वसामान्यांन्या लोकलवर अवलंबून रहावं लागत आहे.

  common passengers are still waiting for the locals traveling on fake IDs Seeing the number of fines you will also say I will wait but I will go by bus