
शरद पवारांसोबतच एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन भाजपने त्यांचा ट्रोल केलं. यानंतर मात्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत चांगलेच संतापले. यादरम्यान त्यांनी 'च' शब्दही उच्चारला. यानंतर आता भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला. या प्रकरणात आता भाजप महिला मोर्च्यानं दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह टिव्ट करत, वापरलेल्या ‘च’ शब्दावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवारांसोबतच एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन भाजपने त्यांचा ट्रोल केलं. यानंतर मात्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत चांगलेच संतापले. यादरम्यान त्यांनी ‘च’ शब्दही उच्चारला. यानंतर आता भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला. या प्रकरणात आता भाजप महिला मोर्च्यानं दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तर दुसरीकडे भाजप नेत्यांविरुद्ध अश्लील तसेच स्त्रीयांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी शेरेबाजी करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मुंबई भाजप महिला मोर्चातर्फे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दरम्यान राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते ‘च’ शब्दाचा वापर केला होता. या वक्तव्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून भारतीय दंडसंहितेच्या कलम 354 ए (1) व (4), 509, 504,500 नुसार सुयोग्य गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यात केली आहे.
चुतीया शब्द का सही इस्तेमाल सिर्फ योगीजी ने किया है..
महाराष्ट्र भाजपा pls एकबार सून लिजियेhttps://t.co/4FF9Sqg5Or— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2021
काय म्हणाले होते राऊत?
संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते की, “त्यावेळी तेथे लालकृष्ण अडवाणी जरी उपस्थित असते तर मी त्यांनाही खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय लक्षात गेता महाराष्ट्रातल्या पितृतुल्य, वडीलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही जर गोष्ट गुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राराची संस्कृती नसून विकृती आहे.” याच दरम्यान टीका करताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दही उच्चारले आणि त्यावरुनच भाजपने आता संजय राऊतांवर यांच्यावर निशाणा साधत दिल्ली आणि मुंबईत तक्रार दाखल केली आहे.