Conclusion of the Sant sahitya Sammelan with the demand for the establishment of a Santpeeth nrvb
संतपीठाच्या स्थापनेच्या मागणीने संतसाहित्य संमेलनाचा समारोप

फडकरी बांधवासाठी संतपीठ निर्माण करावे. फडकरी बांधवांना मासिक मानधन मिळावे. भीमा, इंद्रायणी व निरा या नदीचे पात्र प्रदूषण मुक्त करावे. आळंदी येथे वारकरी व फडकरी यांच्या जमिनीचे आरक्षण रद्द करावे. संत साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून कायम स्वरुपी आनुदान मिळावे. असे ठराव संत साहित्य संमेलना दरम्यान मंजूर करण्यात आले.

मुंबई : राज्य सरकारने मान्य केलेले संतपीठ लवकरात लवकर उभारण्याची मागणीने मंगळवारी नवव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा समारोप झाला. इंद्रायणीसह नीरा आणि भीमेचे पात्र प्रदूषण मुक्त करावे, सर्व फडकऱ्यांना मासिक वेतन मिळावे असे ठराव ही संमेलनात मंजूर करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन   पार पडले. त्याच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.

वारकरी साहित्य परिषदेच्या ९ व्या मराठी संत साहित्य संमेलनाचे आज समापन झाले. पैठण किंवा पंढरपूर येथे लवकरात लवकर संतपीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यासह एकूण सात ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. सर्व फडकऱ्यांना मासिक वेतन मिळावे, इंद्रायणी नदीसह भीमा आणि नीरा नदीचे पात्र प्रदूषण मुक्त करावे, आळंदी येथील फडकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करावे, संत साहित्य संमेलनासा सरकारकडून अनुदान मिळावे असे ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.

तसेच, संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी तीन जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंढरपूरचे फडप्रमुख दादामहाराज शिरवळकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पुत्र भागवत शिरवळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्री आणि खोपोलीतील लांबे महाराज यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाची माहिती हभप विठ्ठल पाटील यांनी दिली. संतपीठाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तर, शासन दरबारी असलेले वारकरी संप्रदायांचे विषय मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून पसायदान गाऊन घेतले आहे. त्याचे सादरीकरणही संत साहित्य संमेलनात करण्यात आल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली.

समाजात होत असलेल्या नैतिकतेचा ऱ्हास थांबविण्यासाठी गावगावात संत साहित्य पोहचायला हवे. विद्यार्थ्यांपर्यंत संताची शिकवण पोहचविण्यासाठी विशेष जागरण मोहिम घेण्याची गरज संमेलनाचे अध्यक्ष चकोर महाराज बाविस्कर यांनी केली. तर, किर्तनाला विनोदी कार्यक्रमाचे स्वरूप देत दर्जा घसरविणाऱ्या प्रवृत्ती आवरण घालावी, अशी मागणी फडकरी संघटनेचे माजी अध्यक्ष माधव महाराज शिवणीकर यांनी संमेलनात केली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केला संत परंपरेचा गौरव

डॉ. आंबेडकरांनी संविधानातून मांडलेला समतेचा विचार संतानी महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला. समाजातली जातीयता नष्ट करण्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी संत परंपरेची थोरवी सांगितलीय.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. प्रविण दरेकर यांनीही या सांगता सोहळ्यात आपले विचार मांडले. आपल्या भाषणात मा. दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘पहिले मंदिर फिर सरकार’ असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदलली आहे, म्हणूनच संजय राऊत राम मंदिर राजकारणापासून दूर ठेवायले हवे अशी भाषा करीत आहेत. तसेच राममंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात येत आहे, खंडणी नव्हे असे ठणकावून सांगतानाच दरेकर म्हणाले की, आपण म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून अगोदर बाहेर या, असा मार्मिक टोलाही दरेकर यांनी राऊत यांना लगावला आहे.

वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या जुहू परिसरातल्या हॉटेल नोव्हेटेल इथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनादरम्यान अनेक विषयांवर चर्चा आणि परिसंवाद पार पडले. तर वारकरी समुदायाशी संबंधित सात महत्वाचे ठरावही मंजूर करण्यात आले.

हे झाले आहेत ठराव मंजूर

फडकरी बांधवासाठी संतपीठ निर्माण करावे. फडकरी बांधवांना मासिक मानधन मिळावे. भीमा, इंद्रायणी व निरा या नदीचे पात्र प्रदूषण मुक्त करावे. आळंदी येथे वारकरी व फडकरी यांच्या जमिनीचे आरक्षण रद्द करावे. संत साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून कायम स्वरुपी आनुदान मिळावे. असे ठराव संत साहित्य संमेलना दरम्यान मंजूर करण्यात आले.