काँग्रेसला विरोधक लागत नाही; निलेश राणेंचा काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप

काँग्रेसला विरोधक लागत नाही असे ट्विट करत निलेश राणे यांनी काँग्रेसला जबरदस्त टोला लगावला आहे. “काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय.

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रमुख नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेस  पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत.

काँग्रेसला विरोधक लागत नाही असे ट्विट करत निलेश राणे यांनी काँग्रेसला जबरदस्त टोला लगावला आहे. “काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही,” असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली. मात्र, यानंतर मुंबई काँग्रेसची निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचं अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आलं आहे. या निवडीमुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाला काही अर्थच उरणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यावरुन निलेश राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.