काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण

माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

    राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच सरकारकडून खबरदारीचे उपायही सूचवण्यात येत आहेत. परंतु काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

    माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

    दरम्यान, कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं पालन न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्यांची आई रश्मी ठाकरे, तसंच मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.