काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या शोक भावना

शरद रणपिसे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना करताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे सदस्य, दोन वेळा विधानसभेचे सदस्य, तीन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.

    मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून पक्षाने काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

    शरद रणपिसे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना करताना थोरात म्हणाले की, शरद रणपिसे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे सदस्य, दोन वेळा विधानसभेचे सदस्य, तीन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.

    अनेक विषयांचा त्यांचा अत्यंत चांगला अभ्यास होता. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात काँग्रेस पक्षाचा विचार जपला आणि तळागाळातील लोकांसाठी कार्य केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. शरद रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण रणपिसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.