विधानसभाध्यक्ष पदाच्या बदल्यात काँग्रेसला पाहिजेत दोन मंत्रिपदे ! नाना पटोले पुन्हा दिल्ली दरबारी

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळू नये, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने निवडणूक टाळल्याची चर्चा राज्यात सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीतून बोलाविणे आले. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक न झाल्यामुळे काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचे बोलले जात असून याबाबत चर्चा करण्यासाठी पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत(Congress needs two ministerial posts in exchange for the post of Speaker! Nana Patole again Delhi Darbari).

  मुंबई : काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळू नये, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने निवडणूक टाळल्याची चर्चा राज्यात सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीतून बोलाविणे आले. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक न झाल्यामुळे काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचे बोलले जात असून याबाबत चर्चा करण्यासाठी पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत(Congress needs two ministerial posts in exchange for the post of Speaker! Nana Patole again Delhi Darbari).

  पृथ्वीराज चव्हाणांना विरोध

  विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतिम क्षणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला आघाडीतून विरोध झाल्यानेच ही निवडणुक टाळण्यात आली. दरम्यान, चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध होता. यामुळे राज्यपालांकडून आक्षेप घेण्यात आल्याचे कारण पुढे करीत आघाडीतील मतभेद समोर येवू नयेत म्हणून निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नियम बदलाच्या कारणारे अध्यक्षपदाचा पेच घटनात्मक होण्याबरोबरच काँग्रेस पक्षात या पदाला न्याय देवू शकेल, अशी योग्य व्यक्ती नसल्याचे किंवा कुणी इच्छुक नसल्याने हे पद शिवसेनेला देवून त्याबदल्यात दोन मंत्रीपदे (मंत्री- राज्यमंत्री) मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर, पटोलेंचे मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्याबाबतही हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे

  कोणाच्याही नावाची शिफारस नाही?

  एकमत होवू न शकल्याने अध्यक्षपदासाठी प्रदेश काँग्रेस समितीने कोणाच्याही नावाची शिफारस केली नव्हती. त्यामुळे त्यासंदर्भातील निर्णय ‘हायकमांड’ला घ्यावा लागणार आहे. काँग्रेसने अध्यक्षपद सोडावे आणि त्या बदल्यात दोन्ही सहकारी पक्षांकडून प्रत्येकी एक मंत्रिपद वाढीव देण्यात यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक मंत्री रिक्त आहे. त्यावर दावा करत काँग्रेसकडून अध्यक्षपदाचा दावा सोडला जावू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

  मात्र, शिवसेनेकडून याबाबत सकारात्मक संकेत मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने या पूर्वीच उपाध्यक्षपद ज्यावर विरोधकांचा दावा आहे ते मिळवले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या बदल्यात शिवसेनेने मंत्रिपदे द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जाण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे, त्यात हे बदल अपेक्षीत आहेत.