मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, भाई जगतापांनी केली ‘इतक्या’ जागांवर लढण्याची घोषणा

काँग्रेसने(Congress To Go Solo In Mumbai Election) मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप(Bhai Jagtap) यांनी काँग्रेस महापालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

    मुंबई: येत्या फेब्रुवारीत मुंबई महापालिकेची (BMC Election)निवडणूक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सगळ्या पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने(Congress To Go Solo In Mumbai Election) मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप(Bhai Jagtap) यांनी काँग्रेस महापालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

    भाई जगताप यांच्या उपस्थितीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक आज संपन्न झाली. यावेळी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव आणि पालकमंत्री अस्लम शेखही उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीचं गणित, निवडणुकीचा आराखडा समजावून सांगितला. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी आम्ही २२७ जागा लढण्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

    दरम्यान, मुंबई महापालिका लागली निवडणुकीच्या कामाला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात वस्ती, झोपडपट्टी, इमारती याचा आढावा घेण्याचे प्रत्येक सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी आदेश दिले आहेत. महापालिका २२७ वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार करणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने माहिती मागवली तर ती दिली जाणार आहे. मुंबईत काँग्रेसकडून ४० ते ४५ वॉर्डच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. काँग्रेसची ही मागणी पूर्ण केली जातेय का हे बघावं लागणार आहे.

    मुंबईत सर्व वॉर्डांच्या सीमा तपासल्या जातील हे आधीच निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तसं काम आता पालिकेकडून सुरू करण्यात आलं आहे. भाजपने बदल केलेल्या वॉर्डांची पुनर्रचना करावी ही काँग्रेसची पहिल्यापासूनची मागणी आहे. भाजपने स्वतःसाठी हा बदल केला होता, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यानंतर ४५ वॉर्डची फेररचना केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी केली आहे.