महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली. परंतु या भेटीनंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे. तसेच महाविकास आघाडीतून काँग्रेसने रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात येत आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली. परंतु या भेटीनंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.