Congress President Nana Patolenche handed over a letter to the Chief Minister for the merger of ST

मागच्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांना भत्ते आणि मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे.

    मुंबई : एसटीच्या विलीनीकरणासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर, तानाजी सावंत यांच्या नंतर आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा  मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या सर्वांच्या पत्रानंतर आता नाना पटोले यांच्या पत्रावर  मुख्यमंत्र्यांचा काय प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


    मागच्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश सुद्धा दिले होते. येत्या २० जानेवारीला या समितीला १२ आठवडे पूर्ण होत आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी हे विलीनीकरण शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. संपकऱ्यांना विलीनीकरणा ऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्ते आणि मूळ वेतनात वाढ देण्याचा प्रस्तावही नुकताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला आहे.
    त्यामुळे, शिवाय यापुढेही नियमित वेतन आणि इतर आश्वासने परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. परंतु, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विलीनीकरणाच्या शिफारशींसाठीचे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिल्यामुळे अनेक विषयांना तोंड फुटत आहे. समाज माध्यमांमध्ये हे पत्र फारच व्हायरल झाले आहे. तसेच, आता पुन्हा एकदा आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे.