परमबीर सिंगांची चौकशी का होत नाही?; काँग्रेसचा एनआयएला सवाल

सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या १०० फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे.

    मुंबई: एपीआय असलेले सचिन वाझे गृहमंत्र्यांविरोधात थेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. यावरून वाझे हे नेमके कुणाच्या जवळचे होते हे सिद्ध होते, असं सांगतानाच सिंग यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल काँग्रेस नेते सचिन वाझे यांनी एनआयएला केली आहे. सचिन वाझे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावर थेट एनआयएवर प्रश्नांची सरबत्ती केली.

    सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या १०० फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे.

    तसेच वाझे वारंवार सिंग यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणात एनआयए सिंग यांची चौकशी का करत नाही? सिंग यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? सिंग यांची अटक टाळण्यात येत आहे का? वाझे सारखा अधिकारी हे सर्व प्रकरण घडवून आणूच शकत नाही. अँटालिया प्रकरण घडण्यापूर्वी वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं, त्याचा तपास व्हावा, असंही ते म्हणाले.