केंद्र सरकारच्या विरोधात ‘भारत बंद’ ला काँग्रेसचा पाठिंबा – भाई जगताप

देशातील रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार, बंदरे इत्यादी सार्वजनिक उपक्रमांना अदानी - अंबानी सारख्या उद्योगपतींना विक्री. दिवसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारी यांच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना, सर्व डाव्या आघाड्या यांनी तीव्र आवाज उठवला असून उद्या सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी 'भारत बंद' चे आवाहन केले आहे.

    मुंबई : देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकूमशाही राजवटीने आणलेले शेतकरी विरोधी प्रमुख तीन काळे कायदे तसेच महागाई विरोधात उदया देशभर भारत बंदची हाक देण्यात आली आहे, त्याला काँग्रेसचा पाठींबा असेल असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले आहे.

    देशातील रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार, बंदरे इत्यादी सार्वजनिक उपक्रमांना अदानी – अंबानी सारख्या उद्योगपतींना विक्री. दिवसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारी यांच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना, सर्व डाव्या आघाड्या यांनी तीव्र आवाज उठवला असून उद्या सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी ‘भारत बंद’ चे आवाहन केले आहे.

    मुंबई काँग्रेसचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून, महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारी संदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून संपूर्ण मुंबईत या हुकूमशाही व कपटी भाजप राजवटीचा आंदोलन करुन निषेध केला जाईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.