devendra fadanvis

विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर भाजप नेते सावध झाले आहेत. भाजपने विधान परिषदेसाठी राजहंससिंह या उत्तर भारतीय उमेदवाराची निवड केल्यानंतर भाजपच्या मराठी नगरसेवक पदाधिका-यांमध्ये तसेच जुन्या अन्य भाषिक कार्यकर्त्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या भाजपा नगरसेवकांची बैठक बोलवली(Congress suspected of rigging in Mumbai assembly polls; Devendra Fadnavis called a meeting of BJP corporators).

    मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर भाजप नेते सावध झाले आहेत. भाजपने विधान परिषदेसाठी राजहंससिंह या उत्तर भारतीय उमेदवाराची निवड केल्यानंतर भाजपच्या मराठी नगरसेवक पदाधिका-यांमध्ये तसेच जुन्या अन्य भाषिक कार्यकर्त्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या भाजपा नगरसेवकांची बैठक बोलवली(Congress suspected of rigging in Mumbai assembly polls; Devendra Fadnavis called a meeting of BJP corporators).

    प्रत्येकी एक उमेदवार विजयी होण्याची स्थिती

    या निवडणूकीत संख्याबळाच्या आधारे भाजप आणि सेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी होण्याची स्थिती आहे. मात्र दगाफटका होवू नये म्हणून भाजपकडून काळजी घेतली जात आहे. भाजपने विधान परिषदेसाठी राजहंससिंह या उत्तर भारतीय उमेदवाराची निवड केल्यानंतर भाजपच्या मराठी नगरसेवक पदाधिका-यांमध्ये तसेच जुन्या अन्य भाषिक कार्यकर्त्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाकडून खबरदारी घेतली जात आहे असे सांगण्यात येत आहे.

    काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही

    दरम्यान, शिवसेनेकडून सुनील शिंदे यांनी तर भाजपाकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी दाखल केली आहे. पक्षीय बलाबल लक्षात घेता, या दोन्ही जागा सहज निवडून येतील. पण काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिला नाही. मात्र कोपरकर यांनी नाराज नगरसेवकांच्या मदतीने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे भाजपा सावध झाली असून या बैठकीत पालिका निवडणूक तयारीचाही आढावा घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली.