manoj patil and sahil khan

प्रसिद्ध बॉडीबिल्डर मनोज पाटील(manoj patil) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभिनेता साहिल खानला(actor Sahil Khan) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. साहिल खानला १२ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना देत न्यायालयाने त्याला अंतरिम संरक्षण दिले.

    मुंबई : प्रसिद्ध बॉडीबिल्डर मनोज पाटील(manoj patil) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभिनेता साहिल खानला(actor Sahil Khan) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. साहिल खानला १२ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना देत न्यायालयाने त्याला अंतरिम संरक्षण दिले.

    मिस्टर इंडियाचा किताब पटकावणारा आणि प्रसिद्ध बॉडी बिल्डर असलेल्या मनोज पाटीलने साहिल खानने भूतकाळातील राग ठेऊन मानसिक त्रास दिल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप करत १५ सप्टेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला साहिल खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप मनोजने केला आणि या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी पत्रही लिहिले.

    त्यानुसार साहिल विरोधात कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ५११ (जन्मठेपेची शिक्षा), ५०० (बदनामीची शिक्षा), ५०६ (गुन्हेगारी धमकीची शिक्षा), ३४ (इतर आरोपींसह सामान्य हेतू) अंतर्गत २० सप्टेंबर रोजी साहिल खान विरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर साहिलेनी मनोजविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा करत गुन्हा नोंदवला. मात्र, आपल्याला अटक होऊ नये म्हणून साहिलने लगेचच दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.

    मात्र, २३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने साहिलचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर साहिले उच्च न्यायालयात धाव घेतली होती. साहिल हा एक अभिनेता तसेच एक फिटनेस उद्योजक आहे. आपल्याविरोधात दाखल कऱण्यात आलेला एफआय़आर हा चुकीचा, अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचा दावा साहिलेने याचिकेतून केला आहे.

    त्या अर्जावर मंगळवारी न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने न्यायालयाने साहिल खान याला दिलासा देत १२ ऑक्टोबर पर्यंत अटक करू नये असे पोलिसांना निर्देश देत सुनावणी तहकूब केली.