षडयंत्र रचणे आणि पुरावे नष्ट करने! माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; नवे साक्षीदार, संशयितांची चौकशी होणार

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने परमबीर यांच्या विरोधात पुन्हा खुल्या चौकशीस परवानगी दिली आहे.

    मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने परमबीर यांच्या विरोधात पुन्हा खुल्या चौकशीस परवानगी दिली आहे.

    एसीबी यापूर्वीही परमबीर यांच्या विरोधात एका पोलिस निरीक्षकाने केलेल्या तक्रारीवरून चौकशी करीत आहे. त्यांच्या विरोधात बी.आर. घाडगे यांनी तक्रार दिली होती. त्यात त्यांनी षडयंत्र रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप केला होता.

    गृहविभागाच्या परवानगीनंतर आता एसीबी या प्रककरणाची चौकशी करणार असून या प्रकरणातील नवे साक्षीदार, संशयितांनाही चौकशीस बोलावण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांचे जबाबही नोंदविले जाण्याची शक्यता आहे. सोबतच लूकआऊट सर्क्युलरही जारी करण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, एसीबीची ही चौकशी घाडगे यांच्या तक्रारीच्या आधारावरच होणार असून यासाठी महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. एप्रिल महिन्यात या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत अॅट्रॉसिटीचाही गुन्हा नोंदविला होता. याशिवया घाडगे यांनी सिंह यांच्यावर भ्रष्टाचार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातही पैसे घेण्याचे आरोप केले होते.