दादर, परळ, भायखळा, गोरेगावमध्ये दूषित पाणीपुरवठा, पाणी विभागाच्या अहवालातून समोर

मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवालातील आकडेवारीनुसार, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ झाल्याची नोंद केली गेली आहे. मुंबईला रोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.

    मुंबई – दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला असून त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जुन्या आणि खराब पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याच्या दूषितेत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे अतिसारासारखे आजार होण्याची शक्यता आहे.

    मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवालातील आकडेवारीनुसार, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ झाल्याची नोंद केली गेली आहे. मुंबईला रोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.

    मुंबईत ४ लाखांहून अधिक मीटरचे पाणी कनेक्शन आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत नागरी संस्थेने तपासलेल्या एकूण २९ हजार ५१ पाण्याच्या नमुन्यांपैकी २७५ – ०.९४ टक्के इतके दूषित पाणी आढळले. पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषण हे ३.४ टक्के दादर, धारावी जी-उत्तर प्रभागमध्ये आढळले. त्यानंतर २.४ टक्के पी -दक्षिण येथील गोरेगाव, टी वॉर्डमधील मुलुंडमध्ये २.३ टक्के आणि एफ-उत्तर सायन, माटुंगामध्ये २.२ टक्के इतके दूषित पाणी आढळले आहे.

    चाचणीसाठी गोळा केलेल्या एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी २७५ मध्ये ई-कोलाय जीवाणूंचे प्रमाण दिसून आले. यामुळे अतिसार आणि पेचिशसारखे आजार होऊ शकतात. दूषित पाणी खराब झालेल्या किंवा जुन्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे झाले असावे असे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.