शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक

आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा कोट्यावधीची कर माफ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. दंड माफ दिल्यावरुन भाजप आक्रमक होत, सरकार आरोपींना पाठींशी घालत आहे, असा आरोप करत, यावर बराच वाद झाला होता. यावर आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : राज्य सरकारने मागील मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना, आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा कोट्यावधीची कर माफ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. दंड माफ दिल्यावरुन भाजप आक्रमक होत, सरकार आरोपींना पाठींशी घालत आहे, असा आरोप करत, यावर बराच वाद झाला होता. आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना विहंग गार्डन इमारतीच्या कराबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्य मंत्रिमंडळात घेऊन सोडवण्यात आला आहे. २००७ साली पहिली परवानगी इमारतीला मिळाली होती. त्यानंतर विहंग डेव्हलपर्स आणि विनय डेव्हलपर्सने या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली. ७-७ माळ्याच्या ४ इमारती पूर्ण झाली. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला की, एखाद्या विकासकाने त्यांच्याकडे आरक्षित असलेला भूखंड जर स्थानिक स्वराज्य संस्थेला दिला आणि देत असताना त्याचा टीडीआर मिळेलच परंतु त्या ठिकाणी जे आरक्षण असेल त्यानुसार बनवून दिले तर त्या विकासकाला त्याचाही टीडीआर मिळेल. त्यामुळं हा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला त्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत.

    दरम्यान, अनेक गोष्टी अशा आहेत की, एखाद्या आयएस अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करुन शिवसेनेचा आमदार असल्यामुळे कारवाया केल्या आहेत. त्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली. ही इमारत विकसीत करत असताना ७ माळ्याची इमारत पूर्ण झाली होती. ५ माळ्याचा टीडीआर बाकी होता. महापालिकेची शाळा बांधून झाली होती परंतु जाणीपूर्वक शाळा हस्तांतर केली नाही. कारण जर शाळा घेतली असती तर त्यांना टीडीआर द्यावा लागला असता यामुळे ती हस्तांतर केली नाही. ती तांत्रिक बाजू ग्राह्य धरुन ट्रान्सफर झाल्यावर जाता जाता या इमारतीची जी फाईल होती त्या फाईलवर ताशेरे ओढवले आणि अनधिकृतरित्या टीडीआर कागदावर न चढवता विहंग डेव्हलपर्सने ७ च्या ऐवजी १२ माळे बनवले आहेत. जर विहंग डेव्हलपर्सना बनवायची असेल तर १२ माळ्याची कशाला बनवेल जेवढे चटई क्षेत्र आहे. तेवढे चटई क्षेत्र वापरल गेल कारण महापालिकेचा टीडीआर मिळणार म्हणून बांधकाम करण्यात आले होते. यानुसारच इतर बिल्डर्सने काम केले होते. त्यामुळ यावर आक्षेप घेण्यासारखे काहीही नव्हते.

    पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, विहंग गार्डन अनधिकृत असेल तर हिरानंदानी मेडॉसपण अनधिकृत असली पाहिजे. परंतु हिरानंदानी मेडॉसला ओसी दिली परंतु ज्या विहंग गार्डनमध्ये सर्वसामान्य लोक राहतात त्या इमारतीला का नाही दिली? जास्तीत जास्त २ हजार रुपयांपर्यंत घर विकली गेली. परंतु राजकारण केलं गेलं एखाद्या वरिष्ठ आयएस अधिकाऱ्याने जाणीपूर्वक आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन फाईल रंगवली आणि जाता जाता दंड लावला त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने आमच्या भूमिकेची दखल घेतली आणि आमचा प्रश्न मार्गी लावला. पण विरोधक आणि भाजप याचे राजकारण करत आहेत, हे दुखदायक आहे, असं सरनाईक म्हणाले.