कोरोनाचा विस्फोट! महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा नाही; अंतिम निर्णय घेऊन मुख्यमंत्री घोषणा करणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज टास्कफोर्सच्या सदस्यां सोबतच्या बैठकीत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाल्यास करायच्या उपचारांबद्दल चर्चा केली. रुग्ण बाधित झाल्यानंतर त्याला कशा पद्धतीने उपचार द्यावे, तसेच लहान मुलांच्या लसीकरणामध्ये कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करायचा या विविध विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र निर्बंध लावण्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाली नसल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे(Corona blast! Lockdown again in Maharashtra? There is no significant discussion at the taskforce meeting; The Chief Minister will take the final decision and make an announcement).

    मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज टास्कफोर्सच्या सदस्यां सोबतच्या बैठकीत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाल्यास करायच्या उपचारांबद्दल चर्चा केली. रुग्ण बाधित झाल्यानंतर त्याला कशा पद्धतीने उपचार द्यावे, तसेच लहान मुलांच्या लसीकरणामध्ये कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करायचा या विविध विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र निर्बंध लावण्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाली नसल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे(Corona blast! Lockdown again in Maharashtra? There is no significant discussion at the taskforce meeting; The Chief Minister will take the final decision and make an announcement).

    टास्क फोर्स दिवसांनंतर पुन्हा चर्चा करणार

    मुंबईत ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाल्याची शक्यता आहे की नाही, हे सांगणे सध्या कठीण आहे,याबाबत २१ डिसेंबर पासून आलेल्या बाधित प्रकरणांच्या जिनोम स्क्विन्सिंग अहवाल येत्या दोन दिवसांत अपेक्षीत आहे. त्या मध्ये ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही. याचे चित्र स्पष्ट होईल. वाढीव रुग्ण संख्या आहे की ओमिक्रॉमुळे आहे की डेल्टामुळे आहे की इतर विषाणूमुळे आहे, याची नेमकी स्थिती समजल्यानंतर टास्क फोर्स पुढील दोन दिवसांनंतर त्याबाबत पुन्हा चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आवश्यकता भासल्यास विकेंड लॉकडावून सारख्या तसेच बाजारपेठांना नियमीत वेळा देण्याबाबत विचार केला जावू शकतो असे या सूत्रानी सांगितले.

    परिस्थितीचा आढावा घेण्यात आला

    आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे. त्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत आणि लहान मुलांच्या १५ ते १८ वर्षाच्या लसीकरण सुरुवातीला मोठ्या जम्बो लसीकरण केंद्र मध्ये किंवा मोकळ्या जागेत लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या नियोजनावर चर्चा झाली. दरम्यान ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका जागेवर येऊ नये असे आदेश दिलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी ,मैदाne इथे सुद्धा लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान नागरीकांनी अनावश्यक घराबाहेर फुरू नये तसेच नव्या वर्षाचे स्वागत घरातच करावे आणि संसर्ग टाळावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे.