कोरोनाचे हॉटस्पॉट – मुंबईत १९३ इमारतींना टाळे; २० झोपडपट्ट्या सील

पालिकेच्या आरोग्य विभागानुसार, मुंबईत हॉटस्पॉट असणाऱ्या सर्व सोसायट्यांना नोटीस पाठवण्यात आली असून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर इत्यादी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

    मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्णसंख्या वाढू लागल्याने आता कंटेटमेंट झोनचीही संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत १९३ इमारती आणि २० झोपडपट्टी परिसर सक्रीय रूग्ण असल्यामुळे प्रतिबंधित घोषित करण्यात आल्या आहेत. एका दिवसापूर्वीच पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत अंशत: लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले होते. मुंबईत अद्यापही काही नाईट क्लब रात्री उशीरापर्यंत सुरू राहतात. येथे गर्दी वाढत आहे. ट्रेन, बस, लग्न सोहळा आणि गर्दीचे ठिकाणे, पर्यटनस्थळ येथे अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, तसेच पालिकेने हॉटस्पॉट असणाऱ्या सोसायट्यांना नोटीसा धाडल्या आहेत.

    मुंबईत सध्या १०,७७९ सक्रीय रूग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून दुप्पट होण्याचा कालावधी २२५ दिवसांचा आहे. प्रतिबंधित घोषित करण्यात आलेल्या परिसरात घराघरांत जाऊन रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत कोरोना संसर्गाची माहिती मिळताच आतापर्यंत ३४ लाख ३४ हजार ६१० जणांची चाचणी करण्यात आली आहे.

    कोरोनाचे हॉटस्पॉट