कोरोना वाढतोय! राज्यात बुधवारी आढळले कोरोनाचे ४६ हजारहून अधिक रुग्ण

बुधवारी आज राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सलग दोन दिवस ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नव्हता, आज मुंबईत ओमिक्रॉनचे २१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत २८ हजार ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत राज्यात ६६ लाख ४९ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  मुंबई : कोरोना दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे, त्यामुळ शासन, प्रशासन काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. बुधवारी आज राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सलग दोन दिवस ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नव्हता, आज मुंबईत ओमिक्रॉनचे २१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.०१ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत २८ हजार ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत राज्यात ६६ लाख ४९ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १५ लाख २९ हजार ४५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळं कोरोना वाढतोय, काळजी घ्या.

  बुधवारी ४६ हजारहून अधिक रुग्ण आढळले त्यातले म्हणजे ८६ टक्के रुग्ण हे होम क्वारंटाईन आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रुग्णांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत, उर्वरित १४ टक्के रुग्णांपैकी १ टक्क्यांहूनही कमी रुग्ण आयसीयूत आहेत. ०.३२ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयूत असलेल्या रुग्णांची संख्या ही०.५९ टक्के इतकी आहे. ऑक्सिजन बेडवर रुग्णांची संख्या १.८९ टक्के इतकी आहे. राज्यात जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असली तरी परिस्थिती चिंताजनक नाही तसेच काळाजी करण्याचे कारण नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

  बुधवारी राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, ३० राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३१ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. बुधवारी राज्यात ८६ ओमायक्रॉनचे रुग्ण खालीलप्रमाणे

  • पुणे मनपा – ५३
  • मुंबई- २१
  • पिंपरी चिंचवड – ०६
  • सातारा – ०३
  • नाशिक – ०२
  • पुणे ग्रामीण – ०१