हाहाकार! कोरोनामुळे महाराष्ट्रात २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर २ हजार १४५ जण घेतायेत उपचार

कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही होत आहे. महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत एकूण २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १४५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. मृत्यूमधील १२६ मुंबई पोलीस कर्मचारी होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना निर्बंधांमध्ये पोलीस प्रत्यक्ष रस्त्यावर असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच अधिक लोकांच्या संपर्कात आल्यामुळं त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार घालयाला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाने राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रात शिरकाव केला आहे. कोरोनाचा संसर्ग नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही होत आहे. महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत एकूण २६५ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १४५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. मृत्यूमधील १२६ मुंबई पोलीस कर्मचारी होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना निर्बंधांमध्ये पोलीस प्रत्यक्ष रस्त्यावर असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच अधिक लोकांच्या संपर्कात आल्यामुळं त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

    कोरोनाने कोणत्यात क्षेत्राला सोडले नाही आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ३७० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे २६५ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तसेच मुंबई पोलीसमधील १२६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्यने पोलिसांना कोरोना संसर्ग होत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ६० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण २१०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीसमध्ये ७४१ कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन पोलिसांना काम करावे लागत असल्यामुळं संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे.

    दरम्यान, कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये एकूण ४८, ६११ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६ हजार २०४ अधिकारी आणि ४२ हजार ४०७ जवानांचा समावेश आहे. तर ४६ अधिकारी आणि ४५८ जवानांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी महाराष्ट्रात ४६ हजार ७२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी २७ टक्के जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळं पोलिस दलात सुद्धा आता भीती व्यक्त केली जात आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ३७० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन पोलिसांना काम करावे लागत असल्यामुळं संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे.