कोरोनाचा उद्रेक वाढला : मुंबईमध्ये लोकलची गर्दी टाळण्यासाठी आता ५० टक्के उपस्थिती ; आदेश जारी

मुंबईत दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरात कोरोनाचे पुन्हा १८० रुग्ण सापडलेत.. त्यामुळे आतापर्यंत १७ इमारतींसह दोन चाळी-झोपड्या आणि ३७३ मजले सील करण्यात आल्यात.मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे

    मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून राज्यात सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफ लाईन असलेल्या लोकलमध्ये वाढती गर्दी पाहता मुंबई महापालिकेने आता खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादले आहेत. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आदेश देण्यात आलेत. याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात मनपाने पाच पथके तैनात केली आहेत. ही पथके खासगी कार्यालयांवर नजर ठेवणार आहे. नियम मोडणा-या कार्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. हा नियम पालिका कर्मचाऱ्यांना लागू नसून त्यांची उपस्थिती मात्र 100 टक्केच राहणार आहे.

    मुंबईत दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरात कोरोनाचे पुन्हा १८० रुग्ण सापडलेत.. त्यामुळे आतापर्यंत १७ इमारतींसह दोन चाळी-झोपड्या आणि ३७३ मजले सील करण्यात आल्यात.मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील चाचण्याचं प्रमाण वाढवल्यामुळे ही रुग्ण वाढ होत आहे. मुंबईत काल दिवसभरात ४६ हजार ८६९ चाचण्यात झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी घटून ७५ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे ३३हजार ९६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत