महाराष्ट्रात कोरोनाचा महाउद्रेक! शाळा सुरूच राहणार की बंद होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रात कोरोनाचा महाउद्रेक झाला आहे. अशात शाळा सुरूच राहणार की बंद होणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी तूर्तास शाळा सुरूच राहिल्या पाहिजेत, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे टोपे म्हणाले.( Corona outbreak in Maharashtra! Will the school continue or close? Health Minister Rajesh Tope's explanation).

    मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा महाउद्रेक झाला आहे. अशात शाळा सुरूच राहणार की बंद होणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी तूर्तास शाळा सुरूच राहिल्या पाहिजेत, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे टोपे म्हणाले.( Corona outbreak in Maharashtra! Will the school continue or close? Health Minister Rajesh Tope’s explanation).

    केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेत लस न देता मुलांना लसीकरण केंद्रांवर नेऊन लस द्यावी, असा विचार पुढे आला आहे. त्यासाठी केंद्रांवर मुलांना बसने नेले जावे, अशी चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्र्यांनी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

    राज्यातील 90 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर 57 टक्के लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. ज्या जिल्ह्यात कमी लसीकरण झाले आहे, त्या जिल्ह्यात लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत या संदर्भात प्रशासनाची बैठक होईल. लसीकरणात मागे असलेले जिल्हे राज्य सरासरीवर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती टोपे यांनी दिली.