राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यास, मुलांमध्ये जागृती निर्माण मोहीम राज्यव्यापी करण्याची केली विनंती

शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचा उगम झाला आहे. ही मोहीम कोल्हापूरमध्ये रविवारी सुरु करण्यात येत आहे. ‘कोरोना : बालक जागृती अभियान’ नावाची ही मोहीम ही शिक्षक आणि प्राध्यापकांपासून सुरु करून त्या माध्यमातून तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबद्दलची जागरुकता मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये निर्माण केली जाणार आहे.

  • मुलांमध्ये जागृती निर्माण करत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यास कोल्हापूर सज्ज

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करण्याची सूचना देशातील सर्व वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. या सूचनांची दाखल घेवून महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याने संपूर्ण जिल्ह्यातील मुलांमध्ये या लाटेसंबंधीची जागरुकता मोहीम हाती घेतली आहे. साथरोगाच्या या तिसऱ्या लाटेचा सामना करताना योग्य ती काळजी घेण्याची, त्यांवरील उपचारांवर शास्त्रीय उपाय योजण्याची गरज त्या माध्यमातून अधोरेखित केली जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे गृह व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही मोहीम राज्यस्तरावर सर्वत्र राबवावी, अशी विनंती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केली आहे.

शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचा उगम झाला आहे. ही मोहीम कोल्हापूरमध्ये रविवारी सुरु करण्यात येत आहे. ‘कोरोना : बालक जागृती अभियान’ नावाची ही मोहीम ही शिक्षक आणि प्राध्यापकांपासून सुरु करून त्या माध्यमातून तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबद्दलची जागरुकता मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये निर्माण केली जाणार आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून मुलांमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी काय करायचे, तिसऱ्या लाटेचे संभाव्य धोके, तसेच तपासणी आणि लागण झाल्यास करावयाचे उपचार यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा कृती दलाद्वारे स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. ही मोहीम बालवाडी ते बारावीदरम्यानच्या विद्यार्थ्यांमध्ये राबविली जात आहे.

या मोहिमेची संकल्पना काही दिवसांपूर्वी आमदार आसगावकर यांनी मांडल्यावर मंत्री सतेज पाटील यांनी ती उचलून धरली आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

“आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्याप्रमाणे इशारा दिला आहे, त्यानुसार कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागांमध्ये ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यांत सर्वाधिक धोका मुलांना संभवतो आहे. आजपर्यंत शालेय मुले या साथरोगापासून वाचली होती, त्यांना आता धोका संभवत असल्याने त्यांच्यामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरणार आहे. हे तंत्रज्ञान या मुलांनी वर्षभर ऑनलाइन अभ्यास करताना आत्मसात केले असल्याने त्याचा प्रभावी वापर या मोहिमेदरम्यान करणे शक्य होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही मोहीम राबविल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यताही त्यामुळे बाद होईल,” असे उद्गार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काढले.

पाटील यांनी ही मोहीम राज्यस्तरावर राबविली जावी अशी विनंती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

“या मोहिमेच्या अंमलबजावणीची सुरुवात कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारपासूनच सुरु होत आहे. ही मोहीम इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा राबविली जावी आणि त्यामध्ये डॉक्टर, समुपदेशक, स्थानिक लोप्रतीनिधी आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांचा समावेश असावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसे झाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी होईल आणि त्यासाठी शास्त्रीय मार्गांचा अवलंब करण्याची सवय कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील मुलांमध्ये आणि पर्यायाने त्यांच्या पालकांमध्ये लागेल,” असेही पाटील म्हणाले.

Corona updates Minister of State Satej Patil urges School Education Minister Varsha Gaikwad to fight against possible third wave of corona launch statewide awareness campaign among children