कोरोना आता जगूही आणि मरूही देईना : Delta Plus मुळे राज्यात पुन्हा नवे निर्बंध; मुंबईत असे असतील नियम आणि लोकल ट्रेनबाबत असा घेतलाय निर्णय?

राज्य सरकारने (State Government) २५ जून २०२१ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार बृहन्ममुंबई महानगरपालिका (BMC) लेवल ३ (Level 3) मध्ये येत असून लेवल तीनचे निर्बंध (restrictions) मुंबईत (Mumbai) लागू असणार आहेत.

  मुंबई : कोविड१९ च्या डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant of Coronavirus) राज्यभरात नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचाही समावेश आता लेवल २ मधून लेवल ३ मध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) निर्बंधांबाबत नव्याने आदेश जारी केले आहेत.

  बृहन्ममुंबई महानगरपालिका हद्दीत मागील २ आठवड्यातील कोविड १९ चा पॉझिटिव्हिटी दर ३.९६ टक्के इतका असून ऑक्सिजन बेड व्याप्तीचा सरासरी दर २६.०४ टक्के इतका आहे. राज्य सरकारने २५ जून २०२१ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार बृहन्ममुंबई महानगरपालिका लेवल ३ मध्ये येत असून लेवल तीनचे निर्बंध मुंबईत लागू असणार आहेत.

  कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी मुबंई मनपा हद्दीत लेवल ३ चे निर्बंध लागू करण्याचे आदेश १८ जून २०२१ रोजी लागू केले होते ते आता पुढील आदेशापर्यंत जसेच्या तसे लागू असणार आहेत.

  दरम्यान, नागरिकांना सोशल डिस्टंन्सिग, मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नवे निर्बंध हे २८ जून २०२१ पासून लागू असणार आहेत.

  सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होणार?

  मुंबईचा समावेश लेवल ३ मध्ये होत असल्याने सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार नाहीये. त्यामुळे आता सुरू असल्याप्रमाणे केवल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरू राहणार आहे.

  new restrictions in maharashtra state due to delta plus what are new rules for mumbai know full story in details