लहान मुलांसाठी करोनाची लस लवकरच येणार, अदर पूनावाला यांची माहिती

लहान मुलांसाठीच्या कोवावॅक्स या लसीच्या घेण्यात येत असलेल्या चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष याविषयी माहिती दिली. “लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्श दिसत आहेत. अगदी ३ वर्षे वयाच्या मुलांवर देखील या लसीची चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांमधून येणाऱ्या निष्कर्षांचा विचार करता लहान मुलांसाठीची आमची लस पुढील सहा महिन्यांत लाँच केली जाईल”, असं अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

    मुंबई : सध्या जगभरात ओमायक्राँनचे सावट असताना, आणि सर्वाना ओमायक्राँनचा धोका असताना, भारतात एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात कोरोनाच्या लसीच्या पहिला डोस १०० करोडपेक्षा अधिक लोकांनी घेतलेला आहे. पण अनेक देशांना लहान मुलांच्या लसीकरणाच्या प्रश्न भेडसावत आहे. आत्तापर्यंत अनेक देशांनी आपल्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा लसीकृत केला आहे. मात्र, अद्याप भारतात लहान मुलांना देण्यासाठी कोणत्याही लसीला मान्यता मिळालेली नाही. देशभरात अनेक संस्था लहान मुलांना देता येईल, अशी करोना लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. मात्र, अद्याप ही लस कधी येईल, याविषयी कोणतीही निश्चित माहिती मिळत नसताना आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी यासंदर्भात एक आनंदाची माहिती दिली आहे.

    सिरम इन्स्टिट्युटकडून कोरोना लसीचे सर्वांधिक उत्पादित केले जात आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती सिरमकडून केली जात आहे. त्यामुळे सिरमकडूनच १८ वयोगटापेक्षाही खालच्या आणि थेट तीन वर्षे वयाच्या मुलांना देखील देता येईल अशा लसीची घोषणा करण्यात आली होती. या लसीवर व्यापक प्रमाणात संशोधन करण्यात येत होतं. अखेर त्याच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर भाष्य करताना अदर पूनावाला यांनी ही लस कधी येईल याविषयी मोठी घोषणा केली आहे.

    अदर पूनावाला यांनी एका कार्यक्रमाता बोलताना म्हटले आहे की, लहान मुलांसाठीच्या कोवावॅक्स या लसीच्या घेण्यात येत असलेल्या चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष याविषयी माहिती दिली. “लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्श दिसत आहेत. अगदी ३ वर्षे वयाच्या मुलांवर देखील या लसीची चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांमधून येणाऱ्या निष्कर्षांचा विचार करता लहान मुलांसाठीची आमची लस पुढील सहा महिन्यांत लाँच केली जाईल”, असं अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. त्यामुळं लहान मुलांसाठी लवकरच कोरोनाची लस येणार असल्यामुळं समाधान व्यक्त केलं जात आहे.