Corona virus to be detected in Mumbai sewage; One thousand water samples will be taken from different parts

सध्या मुंबईतील कोविडची रुग्णसंख्या आटोक्यात आली आली आहे. मात्र असे असले तरी अजूनही कोरोना विषाणूवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पालिका सांडपाण्याचे निरीक्षण करून त्यातून कोरोना विषाणू शोधणार आहे. त्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून पाण्याचे एक हजार नमुने घेतले जाणार आहेत. पुढील आठवड्यापासून त्याच्या चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे पालिकेच्या अधिका-याने सांगितले(Corona virus to be detected in Mumbai sewage; One thousand water samples will be taken from different parts).

    मुंबई : सध्या मुंबईतील कोविडची रुग्णसंख्या आटोक्यात आली आली आहे. मात्र असे असले तरी अजूनही कोरोना विषाणूवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पालिका सांडपाण्याचे निरीक्षण करून त्यातून कोरोना विषाणू शोधणार आहे. त्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून पाण्याचे एक हजार नमुने घेतले जाणार आहेत. पुढील आठवड्यापासून त्याच्या चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे पालिकेच्या अधिका-याने सांगितले(Corona virus to be detected in Mumbai sewage; One thousand water samples will be taken from different parts).

    मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांतील पम्पिंग स्टेशन आणि मॅनहोलमधील सांडपाणी तपासणीसाठी घेतले जाणार आहे. एकूण एक हजार नमुने घेतले जाणार असून त्यांचे आधी आरटीपीसीआर आणि जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
    कोरोनाचे रुग्ण सध्या नियंत्रणात असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही विषाणूवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

    सांडपाण्याच्या निरीक्षणानंतर अजूनही विषाणू कुठे आहे की नाही याची माहिती मिळेल. तसेच विषाणू असल्यास तो किती तीव्रतेचा आहे हे समजण्यासही मदत होईल. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कमीत कमी ३५० नमुने लागतात. त्यातही ते पॉझिटिव्ह असतील तर जिनोम सिक्वेन्सिंगसाठी घेतले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त नमुने गोळा करण्याचा प्रयत्न आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.

    कोविड बाधित किंवा विषाणू शोधण्यासाठी आधी रुग्णांचे नमुने घेतले जात होते. आता मुंबईतील विविध भागांतून सांडपाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. पाण्यात कोरोनाचे विषाणू आहेत की नाही हे तपासण्यासाठी नमुन्याची आरटीपीसीआर केली जाईल. त्यात एखादा नमुना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल व त्याआधारे पाण्यात कोविड विषाणू आहे की एखादा व्हेरिएंट याचा शोध घेता येईल असेही ते म्हणाले.