yawatmal corona death

महाराष्ट्रात सध्या दररोज २५ हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. हे पाहता, राज्य सराकरने खासगी रुग्णालये ५० टक्क्यांच्या क्षमतेसह ऑपरेट करण्याचे निर्देश जारी केले आहे. राज्यात शुक्रवारी २५, ६८१ नवे रुग्ण समोर आले होते, तर शनिवारी २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

    मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतसह संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा गंभीर स्थिती निर्माण होत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त घातक आहे. डॉक्टरांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळ आरोग्यसेवा ढासाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे लवकरच रुग्णालयातील बेडची व्यवस्था अपुरी पडू शकते, अशी भीती वर्तविली जात आहे. आकडेवारीनुसार, देशभरातील एकूण बाधित रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे लोकांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

    महाराष्ट्रात सध्या दररोज २५ हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. हे पाहता, राज्य सराकरने खासगी रुग्णालये ५० टक्क्यांच्या क्षमतेसह ऑपरेट करण्याचे निर्देश जारी केले आहे. राज्यात शुक्रवारी २५, ६८१ नवे रुग्ण समोर आले होते, तर शनिवारी २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

    महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच, नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणि पुढे होळी सण असल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ३१ मार्चपर्यंत नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळित होऊ नये याचीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी, १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. नाशिकमध्ये सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे, तर ठाण्यात ३१ मार्चपर्यंत १६ हॉटस्पॉट्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

    उस्मानाबादमध्ये रात्री ९ ते ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी केली जात आहे. येथे साप्ताहिक बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असून रविवारी पूर्णत: लॉकडाऊन राहणार आहे. पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर, लातूर जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.