मुंबईत कोरोनाची भयानक स्थिती! शाळा-कॉलेज पुन्हा बंद होणार? आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

मुंबईत कोरोनाने कहर सुरू केला असून गेल्या आठ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने मुंबईकरांत चिंता आहे. जर रूग्ण वाढ अशीच सुरू राहिली तर मुंबईत इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते,असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. तसेच शाळा-कॉलेज पुन्हा बंद होणार का? याबाबतही आदित्य ठाकरेंनी महत्त्वपूर्ण माहिती दिली ( Corona's terrible condition in Mumbai! Will school-college be closed again? Important information given by Aditya Thackeray).

    मुंबई : मुंबईत कोरोनाने कहर सुरू केला असून गेल्या आठ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने मुंबईकरांत चिंता आहे. जर रूग्ण वाढ अशीच सुरू राहिली तर मुंबईत इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते,असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. तसेच शाळा-कॉलेज पुन्हा बंद होणार का? याबाबतही आदित्य ठाकरेंनी महत्त्वपूर्ण माहिती दिली ( Corona’s terrible condition in Mumbai! Will school-college be closed again? Important information given by Aditya Thackeray).

    पालिका मुख्यालयाला त्यांनी आज दुपारी भेट दिली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. तसेच, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, असे असले, तरी लोकांना सर्तकतेचे आवाहन त्यांनी केले.

    ठाकरेंनी मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी दिली.आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर यावेळी बोलताना भाष्य केले. पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसºया लाटेची सुरुवात असू शकते पण घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणे देखील दिसत आहेत. पण ते तसेच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेले नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

    दरम्यान, ओमायक्रॉनवर व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या मॅसेजवर देखील त्यांनी निशाणा साधला. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर ओमायक्रॉन गंभीर आहे, नाही असे सगळे सुरू आहे. पण हे सगळे आपण डॉक्टरवर सोडायला हवे.आपण किंवा व्हॉट्सअ‍ॅप ठरवायला लागलो की, ओमायक्रॉन गंभीर नाही, तर ते चुकीचे आहे असे ते म्हणाले.शाळा, कॉलेज याविषयी निर्णय घेतला जाईल. गरज पडली, तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. डबलिंग रेट वाढला आहे.पण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.