rakesh wadhwan

पंजाब ॲन्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या(PMC Bank Scam) ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान(Sarang Wadhwan) आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान Rakesh Wadhwan), दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल(Crime) करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या राकेश वाधवानाची तब्येत खालावल्याने पालिकेच्या के.ई.एम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले आहे.

    मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी(PMC Bank Scam Case) अटक करण्यात आलेला एचडीआयएलचा (HDIL)प्रमोटर राकेश वाधवान(Rakesh Wadhwan) आजारी असून त्यांच्यावर पेसमेकर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयात सुविधा(Court Asked About Medical Facility Given to Rakesh Wadhwan) आणि उपलब्धतेबाबत माहिती देण्यात यावी, सुविधा नसल्यास वाधवान स्वतःच्या खर्चाने शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाची निवड करू शकतात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court Order To State Government) राज्य सरकारला दिले आहेत.

    पंजाब ॲन्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान, दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या राकेश वाधवानाची तब्येत खालावल्याने पालिकेच्या के.ई.एम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका वाधवानने उच्च न्यायालयात केली आहे. त्या याचिकेवर न्या. भारती डांगरेंसमोर सुनावणी पार पडली.

    सुनावणीदरम्यान, वाधवानचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. वैद्यकीय अहवालांनुसार, वाधवन हे अनेक आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना हृदयाचा ‘टची-ब्रॅडी सिंड्रोम’ आजार आहे. त्यासाठी त्यांना ड्युअल चेंबर पेसमेकर लावण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्याची गरज आहे, असे वाधवानच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले, त्यावर पेसमेकर प्रत्यारोपणाची सुविधा के.ई.एम रुग्णालयात नाही. पण इतर कोणत्या सरकारी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे की नाही त्याबाबत माहिती घेऊन सांगण्यात येईल, अशी माहिती सरकारच्यावतीने सांगण्यात आले. तेव्हा, पेसमेकर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहे की नाही त्याबाबत माहिती देण्यात यावी, नसल्यास वाधवान स्वतःच्या खर्चाने शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाची निवड करू शकतात. असे स्पषट करत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.