अँटिलिया स्फोटक प्रकरण – सचिन वाझेचा नजरकैदेचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, फक्त घरचं जेवण देण्यास परवानगी

बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला(No Relief To Sachin Waze) दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने(Session Court) नकार दिला आहे. ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयाने(Court Rejected Sachin waze`s Application) फेटाळून लावला.

    मुंबई: अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक (Mansukh Hiren Murder Case) करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला(No Relief To Sachin Waze) दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने(Session Court) नकार दिला आहे. ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयाने(Court Rejected Sachin waze`s Application) फेटाळून लावला.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रदयासंबंधित त्रास असल्याने ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

    वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात त्याच्यावर १४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर वाझेने विशेष सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला असून शस्त्रक्रिया झाल्यापासून पूर्णपणे बरे होईपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावे अशी विनंती अर्जातून कऱण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी विशेष न्यायायलयात न्या. ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, वाझेला ठेवण्यात येणाऱ्या कारागृहाच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकत न्यायालयाने मानवतेच्या दृष्टीने आरोपीच्या आरोग्याचा विचार करून अर्ज स्विकारावा, अशी मागणी वाझेच्या वतीने वकील रौनक नाईक यांनी न्यायालयाकडे केली. त्याला एनआयएकडून तीव्र विरोध करण्यात आला.

    वाझे आणि एनआयएचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने वाझेला वोकहार्ट रुग्णालयातून कारागृहातील रुग्णलयात नेण्यात यावे, तसेच वाझेला घरातून जेवण देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. गरज भासल्यास जे. जे. रुग्णालयाच्या कारागृह विभागात दाखल करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश देत न्यायालयाने वाझेची मागणी फेटाळून लावली.