नात्याला काळिमा फासणारी घटना – बहिणीने केली भावाचा गळा दाबून हत्या, न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यास दिला नकार

पुण्यात(pune) राहणाऱ्या परमजीत सिंह या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जानेवारी २०१३ साली मृत्यू(murder in pune) झाला. शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी परमजीतची बहीण जगजीत कौर निर्मलासिंग तिचे साथीदार गोलू खान, लल्ला खान आणि दिलीप डोंगरे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने सप्टेंबर २०१४ रोजी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

    मुंबई: बहिण भावाचे नाते (sister and brother relation)नैसर्गिक, जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे असते. मात्र, या नात्याला काळिमा आणि कलंक फासणारे कृत्य सदर खटल्यात बहिणीने केले आहे. असे निरीक्षण नोंदवत जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाची(high court decision) पायरी चढलेल्या महिलेला दिलासा देण्यास खंडपीठाने नकार दिला.

    पुण्यात राहणाऱ्या परमजीत सिंह या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जानेवारी २०१३ साली मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी परमजीतची बहीण जगजीत कौर निर्मलासिंग तिचे साथीदार गोलू खान, लल्ला खान आणि दिलीप डोंगरे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने सप्टेंबर २०१४ रोजी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाच्या निर्णायाला चारही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान देत अपील दाखल केले. त्यावर नुकतीच न्या. साधना जाधव आणि न्या. निजामुद्दीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. परमजीतच्या हत्येमध्ये आपण सामील नव्हतो. तसेच आपल्या भावाला मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता. मी परमजीतला रुग्णालयात घेऊन गेले होते. तसेच पोलिसांनी बनावट पुरावे सादर केले असल्याचा आरोप परमजीतच्या बहिणीकडून सुनावणीदरम्यान करण्यात आला.

    त्यांचा दावा अमान्य करत शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या हत्येमागचे ठोस कारण समोर आले नसले तरीही आरोपीची इच्छा आणि हेतूमुळे कारस्थान रचले असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. तसेच ही घटना म्हणजे बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी आहे. कुटुंबात बहिणी भावाचे नाते हे अनोखे आणि विश्वासाचे असते. त्यामुळे ही नाती म्हणजे परमेश्वराची देणगी असतात. पण या घटनेमुळे या विश्वासाला तडा गेला आहे, असे अधोरेखित करत खंडपीठाने जगजीत कौर आणि इतर आरोपींना दिलासा देण्यास नकार देत सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली. मात्र, चौथा आरोपी दिलीप डोंगरे विरोधात सबळ पुरावे तसेच त्याचा हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न न झाल्याने खंडपीठाने त्याची निर्दोष मुक्तता केली.