राज्यातील परिस्थितीची सर्वंकष माहिती देणारा देशातील सर्वोत्तम डॅशबोर्ड तयार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना १९ संदर्भातील राज्यातील परिस्थितीची सर्वंकष माहिती देणारा देशातील सर्वोत्तम डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे. या डॅश बोर्डवर राज्यातील ऑक्सिजन साठा, पुरवठा, वापर, रुग्णालयातील सर्व प्रकारच्या खाटा, त्यांची उपलब्धता, औषधे यांचीही जिल्हानिहाय माहिती मिळणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे ते मुख्यमंत्र्याच्या ग्रामिण आरोग्य आढावा बैठकीत बोलत होते.

    मुंबई : कोरोना १९ संदर्भातील राज्यातील परिस्थितीची सर्वंकष माहिती देणारा देशातील सर्वोत्तम डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे. या डॅश बोर्डवर राज्यातील ऑक्सिजन साठा, पुरवठा, वापर, रुग्णालयातील सर्व प्रकारच्या खाटा, त्यांची उपलब्धता, औषधे यांचीही जिल्हानिहाय माहिती मिळणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे ते मुख्यमंत्र्याच्या ग्रामिण आरोग्य आढावा बैठकीत बोलत होते.

    स्थूल राज्य उत्पन्नाच्या किमान ५ टक्के निधी

    टोपे म्हणाले की, ही माहिती नियमित अद्ययावत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करताना आरोग्य सुविधांची उभारणी, त्यासाठी लागणारे सक्षम मनुष्यबळ व आवश्यक निधी यांची सविस्तर मांडणी करून आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, नियोजन आयोगाच्या शिफारशीनुसार आरोग्य सेवांसाठी स्थूल राज्य उत्पन्नाच्या किमान ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात यावा. जेणेकरून राज्यातील आरोग्य सुविधा बळकट होण्यास मदत होईल.

    आरोग्य सेवा व आरोग्य संस्थांची पुनर्रचना

    आरोग्य सेवा व आरोग्य संस्थांची पुनर्रचना करण्यात यावी. ज्या भागात आवश्यकता आहे तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची निर्मिती करण्यासाठी मंजुरी मिळावी. तसेच या आरोग्य केंद्राचे बांधकाम, अस्तित्वातील केंद्रांची दुरुस्ती व देखभाल यासाठी विशेष निधी देण्यात यावा. यावेळी राज्यात उपलब्ध असलेल्या ग्रामीण पायाभूत आरोग्य सेवासुविधा, राज्याची सध्याची ऑक्सिजन निर्मिती व उद्दिष्ट पूर्तीसाठी करावयाचे प्रयत्न व कोवीड १९ संदर्भातील डॅशबोर्डचे सादरीकरण करण्यात आले.