‘आझादी का अमृत महोत्सव’ सोहळ्याचा भाग म्हणून CSMIA द्वारे डीजीसीएच्या सहयोगाने ग्राउंड हँडलिंग सुरक्षिततेवरील वेबिनारचे आयोजन

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण (75 years of India's Independence) झाल्याप्रित्यर्थ आणि या दैदिप्यमान राष्ट्राचा इथवरचा प्रवास साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून व्हर्च्युअल मंचावरून घेतल्या गेलेल्या या वेबिनारमध्ये ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्समधील सुरक्षा व आचारसंहितांच्या पालनासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली.

    मुंबई : ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाचा उत्साह आणि शान अधिक उंचावण्याबद्दल आपल्या कटिबद्धतेचे प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA) ने नुकतेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA)च्या सहयोगाने ‘सेफ्टी इन ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्स’ या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते.

    भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण (75 years of India’s Independence) झाल्याप्रित्यर्थ आणि या दैदिप्यमान राष्ट्राचा इथवरचा प्रवास साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून व्हर्च्युअल मंचावरून घेतल्या गेलेल्या या वेबिनारमध्ये ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्समधील सुरक्षा व आचारसंहितांच्या पालनासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली. वेबिनारमध्ये (webinar) एअरलाइन ऑपरेटर्स कमिटी, डोमेस्टिक एअरराइन्स (इंडिगो), ग्राउंड हँडलर्स (सेलेबिनॅस) आणि एअरपोर्ट ऑपरेटर (एमआयएएल) यांच्या प्रतिनिधींनी याच विषयावर केलेली सादरीकरणे उपस्थितांना पाहता आली. डीजीसीए-डब्‍ल्‍यूआर, मुंबईच्या ऑपरेशन्स विभागाचे संचालक या सत्राचे नियामक होते.

    हा वेबिनार मिश्र स्वरूपात आयोजित करण्यात आला व ७०० अधिकारी व्हर्च्युअल पद्धतीने (ऑनलाइन माध्यमातून) तसेच प्रत्यक्ष (ऑफलाइन माध्यमातून) या परिषदेला उपस्थित राहिले. या वेबिनारला डीजीसीए इंडिया, नवी दिल्ली आणि डीजीसीएच्या प्रांतीय कार्यालयांतील वरीष्ठ अधिकारी, एअरपोर्ट संचालक आणि शेड्युल्ड, नॉन-शेड्युल्ड तसेच खासगी ऑपरेटर्ससह एअरक्राफ्ट ऑपरेटर कंपन्यांतील वरीष्ठ अधिकारी, ग्राउंड हँडलर्स व भारतभरातील एअरपोर्टसशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींची सन्माननीय उपस्थिती लाभली. काही आंतरराष्ट्रीय पाहुणेही या वेबिनारला व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले.

    या व्हर्च्युअल कार्यक्रमाच्या अंतिम भागामध्ये सीएसएमआयएच्या रॅम्पवर एक ऑफलाइन प्रत्यक्ष उपक्रम घेण्यात आला. विमानांच्या आगमन-निर्गमनाच्या वेळांदरम्यान त्यांच्या एकूण व्यवस्थापनासाठी एअरलाइन्स आणि ग्राउंड हँडलिंग स्टाफद्वारे ग्राउंड हँडलिंगसाठी हाती घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. काटेकोर कार्यान्वयनासाठी समर्पित वृत्तीने केल्या जाणाऱ्या आपल्या प्रयत्नांमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणत कार्यान्वयनातील अचूकता वाढविणा-या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम सीएसएमआयएकडून सातत्याने केले जात आहे.