प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अरबी समुद्रात आलेल्या तोक्ते चक्रीवादळात (the hurricane in the Arabian Sea) ओएनजीसीचे जहाज P-305 ला (ONGCs ship P-305) जसमाधी मिळाली होती. या बार्जवर २६१ प्रवासी होते, यातील १३ जणांचा शोध अद्यापही सुरु आहे. या जहाजावरील ७३ जणांना जलसमाधी मिळाली (73 people have been found drowned on the ship) असून, त्यापैकी ६० मृतदेह सापडले आहेत. जहाजावरील १८८ जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले (board have been rescued safely) आहे.

    मुंबई (Mumbai).  अरबी समुद्रात आलेल्या तोक्ते चक्रीवादळात (the hurricane in the Arabian Sea) ओएनजीसीचे जहाज P-305 ला (ONGCs ship P-305) जसमाधी मिळाली होती. या बार्जवर २६१ प्रवासी होते, यातील १३ जणांचा शोध अद्यापही सुरु आहे. या जहाजावरील ७३ जणांना जलसमाधी मिळाली (73 people have been found drowned on the ship) असून, त्यापैकी ६० मृतदेह सापडले आहेत. जहाजावरील १८८ जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले (board have been rescued safely) आहे. P-305 सोबतच दुसऱ्या वरप्रदा नावाच्या बोटीवरील ११ जणही बेपत्ता (11 people on another boat named Varaprada are also missing) आहेत. आता या दोन्ही घटना घडून ८० तास उलटून गेलेले असल्यामुळे यापैकी एकही जण जिवंत सापडण्याची शक्यता कमी आहे.

    ‘साइड स्कॅन सोनार’ कडून तपास सुरु (Investigation started from Side Scan Sonar)
    नेव्ही आणि कोस्टगार्डतर्फे सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा आजचा सहावा दिवस आहे. साईड स्कॅन सोनार आणि आयएनएस तरासा आणि आयएनएस मकरची पाणबुडी पथके या मृतदेहांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये P-305 जहाजाचे कॅप्ट्न राकेश बल्लभ यांचाही समावेश आहे. वादळ आल्यानंतर वल्लभ यांनी समुद्रात उडी मारली होती. या जहाजावरील सर्वांचे प्राण धोक्यात घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

    ‘INS मकर’ला कर्नाटकातून मुंबईत आणण्यात आले (INS Makar brought from Karnataka to Mumbai)
    ‘INS मकर’हे सर्वेक्षण करणारे जहाज आहे. हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी या जाहाजाचा वापर करण्यात येतो. या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी हे जहाज मुंबईला पाचारण करण्यात आले आहे.

    साईड स्कॅन सोनार म्हणजे काय ? (What is a side scan sonar)
    समुद्रातील दृष्ट्यात्मकता कमी झाल्यानंतर, मोठ्या परिघात तपास करण्यासाठी साईड स्कॅन सोनारचा उपयोग करण्यात येतो. हाय रिऑल्यूशन असलेल्या या सोनार सिसिस्टमुळे समुद्राच्या तळाशी पडलेल्या वस्तूंचे स्पष्ट चित्र उपलब्ध होऊ शकते. या वस्तूची ओळख पडल्यानंतर पाणबुड्या जाऊन ती वस्तू किंवा व्यक्तीला वर आणू शकते. आयएनएस मकरवरील पाच ते सहा पाणबुड्यांची टीम आता रेस्क्यू कार्यात सक्रीय झाली आहे. एका टीममध्ये पाच ते सहा पाणबुडे असतात.

    इतिहासात पहिल्यांदाच या मतकार्यात सात आय़एनएस नौका सामील आहेत. गेल्या चार दशकातील हे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन मानले जाते आहे. यात आयएनएस तारसा, आयएनस कोच्ची, आय़एनएस कोलकाता, आयएनएस तेग, आयएनएस तलवार, आयएनएस बेतवा या सामील झालेल्या आहेत. तटरक्षक दलाकडून सुभद्रा कुमारी चौहान, संकल्प, समर्थ, सम्राट, समुद्र प्रहरी, सचेत आणि अपूर्व या जहाजांचा यात समावेएश आहे. याचबरोबर हेलिकॉप्टरही या मदतकार्यात सामील आहेत.