
या बैठकीत 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशीही चर्चा करणार आहेत. याव्यतिरिक्त देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज बैठकीत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्र्यांची सर्व विभागांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसारच आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट जाऊन आता कुठं सर्व सुरळीत होत असतानाच आता कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आला आहे. या नव्या व्हेरिएंटने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनेक उपाययोजना करण्यासंदर्भात देशभरात हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी येत्या काळात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुशंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे.
या बैठकीत 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशीही चर्चा करणार आहेत. याव्यतिरिक्त देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज बैठकीत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्र्यांची सर्व विभागांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसारच आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला होता. परंतु आता नवा विषाणू डोकं वर काढत असल्याने शाळा संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात आणखी काही निर्बंध पुन्हा एकदा लागू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.