ओमायक्रॉनचा धोका! निर्बंधांबाबतचा आदेश बदलणार नाही; महाविकास आघाडी सरकारचे केंद्र सरकारला उत्तर

ओमायक्रॉनचा धोका व प्रसार टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी आणि 14 दिवसांच्या गृहविलगीकरणाची सक्ती, या महाविकास आघाडी सरकारच्या निर्बंधांवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने आक्षेप घेतला. या आदेशात बदल करण्याची सूचना केंद्राने महाराष्ट्र सरकारला केली(Danger of Omaicron! Central government's objection to Mahavikas Aghadi government's restrictions; Notice of change of command).

    मुंबई : ओमायक्रॉनचा धोका व प्रसार टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी आणि 14 दिवसांच्या गृहविलगीकरणाची सक्ती, या महाविकास आघाडी सरकारच्या निर्बंधांवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने आक्षेप घेतला. या आदेशात बदल करण्याची सूचना केंद्राने महाराष्ट्र सरकारला केली(Danger of Omaicron! Central government’s objection to Mahavikas Aghadi government’s restrictions; Notice of change of command).

    मात्र, राज्य सरकार आपल्या नियमात बदल करण्यात तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    महाराष्ट्रात येणाऱ्यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावाच लागेल. इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दाखवावाच लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात येताना देखील रिपोर्ट दाखवावा लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.