दरेकर, महाजनांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, शिवबंधन बांधून घ्या…

विरोधी पक्षनेते सरकारवर जोरदार हल्ला चढवत असताना विधिमंडळ परिसरात मात्र भाजपचे इतर नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये उत्तम संवाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या.

  मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावरून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. कोरोनाचा बहाणा पुढे करून पावसाळी अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  दरम्यान विरोधी पक्षनेते सरकारवर जोरदार हल्ला चढवत असताना विधिमंडळ परिसरात मात्र भाजपचे इतर नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये उत्तम संवाद पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या.

  मुख्यमंत्र्यांची गाडी बाहेर पडत असतानाच विधानभवनाबाहेरच उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन घेतलं. त्यावरून नजर फिरवली आणि विरोधकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

  एकालाच गाडीत प्रवेश मिळेल

  गप्पागोष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जायला निघाले. तेव्हा तिघांनीही आम्हाला तुमच्या गाडीत घ्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर एकालाच गाडीत प्रवेश मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर या तिघांनीही दिलखुलास हसून त्याला दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडला होता.

  तसेचं भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना कोपरखळया लगावल्या आहेत.

  नार्वेकर आणि दरेकरांमधील संवाद 

  मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का?

  प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही येऊ शकतो.

  मिलिंद नार्वेकर :- यांना आताच गाडीत या, शिबबंधन बांधूया.

  प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे.