दाऊद इब्राहिमचा सहकारी मोहम्मद अजीम अबू सलीमला NCB कडून अटक

    मुंबई (Mumbai) :  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दाऊद इब्राहिमचा सहकारी, अजीम भाऊ उर्फ मोहम्मद अजीम अबू सलीमला अटक केली. तो खंडणी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतला होता. त्याच्याविरुद्ध खंडणी आणि दरोड्याचे गुन्हे अनेक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवले गेले आहेत.