दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर फरार! दुबईमार्गे पाकिस्तानात पळाला; अमेरिकेने सोडल्याची चर्चा

तीन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिम कासकरचा पुतण्या सोहेल कासकर हा आता फरार झाल्याचे समोर आले आहे. कासकरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भारतीय तपास यंत्रणा, मुंबई पोलिस यासाठी अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर देखील सोहेल कासकर फरार झाला असून तो दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये जाऊन पोहोचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया आणि दाऊद इब्राहिमच्या डी गँगविरोधातील मुंबई पोलिसांच्या मोहिमेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे(Dawood Ibrahim's nephew Sohail Kaskar absconding! Fled to Pakistan via Dubai; Talk of the US releasing him).

  मुंबई : तीन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिम कासकरचा पुतण्या सोहेल कासकर हा आता फरार झाल्याचे समोर आले आहे. कासकरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भारतीय तपास यंत्रणा, मुंबई पोलिस यासाठी अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर देखील सोहेल कासकर फरार झाला असून तो दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये जाऊन पोहोचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया आणि दाऊद इब्राहिमच्या डी गँगविरोधातील मुंबई पोलिसांच्या मोहिमेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे(Dawood Ibrahim’s nephew Sohail Kaskar absconding! Fled to Pakistan via Dubai; Talk of the US releasing him).

  2018 मध्ये अमेरिकेत झाली होती अटक

  2018 मध्ये कासकरला अमेरिकेच्या नार्को टेररिजम विभागाकडून स्पेनमध्ये सापळा रचून अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न भारतीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांकडून सुरू होता. मात्र, मुंबई पोलिसांनी इंटरसेप्ट केलेल्या फोनकॉल्समधून कासकर पाकिस्तानातून बोलतोय असं समोर आले. त्यानंतर सोहेल कासकर अमेरिकेतून दुबईमार्गे पाकिस्तानला पळून गेल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने त्याला सोडल्याची देखील चर्चा सुरू आहे.

  मुंबई पोलिसांच्या रडारवर

  सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिस आणि अमेरिकन यंत्रणा कासकरच्या हस्तांतरणाच्या मुद्यावर सतत संपर्कात होते. कासकरवर भारतात कोणतेही मोठे खटले दाखल नसले तरीही तो मुंबई पोलिसांच्या रडारवर होता. दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबद्दल त्याच्याकडून माहिती मिळाली असती. तसेच, कासकर हा डी कंपनीचा महत्त्वाचा माणूस असल्याने त्याच्याकडून डी कंपनीच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या इतर गोष्टींची माहिती मिळण्यास मदत झाली असती. मात्र, तो पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022