मुंबईतील हॉटेल्सचा मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव स्थायी समितीत लटकला, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष

कोरोनाच्या(Corona) पहिल्या लाटेत महानगरपालिकेने संशयितांसह बाधितांच्या विलगीकरणासाठी हॉटेल्स ताब्यात घेतले होते. त्यासाठी त्यांना २० कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ (Tax Exemption)करण्यात आला होता. तेव्हा १८० च्या हॉटेल्सना मालमत्ता कर माफ करण्यात आला होता.

    मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत(Corona Second Wave) मुंबई महानगरपालिकेने(BMC) विलगीकरणासाठी हॉटेल्स ताब्यात घेण्यात आले होते. या हॉटेलना सलग दुसऱ्या वर्षीही मालमत्ता करात सुट( Property Tax Exemption For Hotels Used For quarantine) देण्यात येणार होती. यंदा ४१ कोटी ८७ लाख रुपयांची सुट देण्याचा प्रस्ताव महानगर पालिका प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला मात्र अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव राखून ठेवल्याने तूर्तास हा प्रस्ताव लटकला आहे.

    कोरोनाच्या पहिल्या लाटेत महानगरपालिकेने संशयितांसह बाधितांच्या विलगीकरणासाठी हॉटेल्स ताब्यात घेतले होते. त्यासाठी त्यांना २० कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. तेव्हा १८० च्या हॉटेल्सना मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. आता २३४ मालमत्तांना चार महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ४१ कोटी ८७ लाख रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. यात मुंबईतील सर्व पंचतारांकीत हॉटेल्ससह २३३ हॉटेल्सना ही सुट मिळणार आहे.तसेच,भायखळा येथील रिचडर्स अँड क्रुडास कंपनीनतही पालिकेने विलगीकरण केंद्र सुरु केले आहे.या कंपनीलाही मालमत्ता करात सुट दिली जाणार आहे.बुधवारच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवत अधिक माहिती मागवली आहे. आता हा प्रस्ताव पुढील स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर होतोय की नाही याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.