महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीला विलंब; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी(MPSC Recruitment) काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला सादर केलेले नाही. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी(MPSC Recruitment) काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला सादर केलेले नाही. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

    मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा आढावा तात्काळ घेऊन आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे स्पष्ट निर्देशच सचिवांना  दिले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तातडीने ही कार्यवाही झाली पाहिजे असे निर्देश दिले आहते.

    राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही देण्यात आहेत. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जाणार आहेत.