Conspiracy to make voters disappear from Mumbai! BJP's serious allegations; Possibility to ignite ward restructuring controversy

राज्यात सत्तेवर असलेल्या मविआ सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने आगामी उत्तर प्रदेश मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्यावर खिंडीत गाठायची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे घाईने मुंबईच्या निवडणुका घेण्याचा शिवसेनेचा मानसा नाही. यावेळी उत्तर प्रदेशात शिवसेना समविचारी पक्षांसह सर्वच्या सर्व जागा लढविण्याच्या विचारात असून त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका प्रभाग रचनेच्या फेररचनेच्या मुद्दयावर जाणिवपूर्व ३-४ महिने उशीराने घेण्याचा घाट घातला जात असल्याचे सांगण्यात येत आहे(Deliberately planning to hold Mumbai Municipal Corporation elections 3-4 months late on the issue of ward restructuring? BJP's allegation).

    मुंबई : राज्यात सत्तेवर असलेल्या मविआ सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने आगामी उत्तर प्रदेश मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्यावर खिंडीत गाठायची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे घाईने मुंबईच्या निवडणुका घेण्याचा शिवसेनेचा मानसा नाही. यावेळी उत्तर प्रदेशात शिवसेना समविचारी पक्षांसह सर्वच्या सर्व जागा लढविण्याच्या विचारात असून त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका प्रभाग रचनेच्या फेररचनेच्या मुद्दयावर जाणिवपूर्व ३-४ महिने उशीराने घेण्याचा घाट घातला जात असल्याचे सांगण्यात येत आहे(Deliberately planning to hold Mumbai Municipal Corporation elections 3-4 months late on the issue of ward restructuring? BJP’s allegation).

    तीन महिने मुंबई महापलिका प्रशासकांच्या हाती जाण्याची शक्यता

    फेब्रुवारी २०२२मध्ये मुदत संपणा-या मुंबई महापलिकेच्या निवडणुकीपूर्वी लोकसंख्या बदलानुसार नवीन निवडणूक प्रभागांचे सीमांकन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतरही त्याबाबतची अधिसूचना मात्र अद्याप जारी करण्यात आली नाही. याबाबतची अधिसूचना लागू झाल्यानंतर अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत ज्या फेब्रुवारीपूर्वी पूर्ण होणे कठीण असल्याने २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक किमान दोन महिने पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जावू शकतो त्यामुळे मे महिन्यापर्यंत राज्यातील अन्य महापालिकाप्रमाणेच तीन महिने मुंबई महापलिका प्रशासकांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

    प्रभागांच्या हद्दीतही फेरबदल आणि सुधारणा

    राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेत लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार महापालिकेचे नव्या २३६ प्रभागांचे सीमांकनही तयार आहे. राज्य सरकारची याबाबत अंतिम अधिसूचना जारी झाली नाही.  या अधिसूचने नंतर मुंबईच्या सध्याच्या २२७ प्रभांगाचे २०२२ च्या निवडणुकीत पासून २३६ प्रभाग होणार आहेत. हे नऊ अतिरिक्त प्रभाग-पश्चिम उपनगरात पाच, पूर्व उपनगरात तीन आणि शहरात एक जोडले जातील अशी शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत प्रभागांच्या हद्दीतही फेरबदल आणि सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणेच भाजपला काटशह देण्यासाठी विचारपूर्वक हद्दीत बदल आणिn सुधारणा केली जाणार आहे, यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

    दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य

    याबाबत निवडणूक आयोग आणि राज्यपाल कार्यालयातून अंतिम मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार अधिसूचना जारी करेल. लोकसंख्या बदलानुसार नवीन निवडणूक प्रभागांचे सीमांकन फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीत लागू करण्यात येईल. नवीन प्रभाग सीमा निश्चित झाल्यानंतर, रहिवाशांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जातील. प्रत्येक प्रभागात सरासरी ५४ हजार लोकसंख्या आहे याची पालिकेने खात्री करावी लागेल, ज्यात १० टक्क्यांपर्यंत फरक असू शकतो. या व्यतिरिक्त, जागांच्या आरक्षणाची लॉटरी काढली जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग  आणि महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल. केवळ दोन महिन्यात या प्रक्रिया पूर्ण होणार नाही, त्यामुळे निवडणुकांना  एप्रिल अखेर किंवा मे महिन्यापर्यंत विलंब होवू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे.

    भाजपच्या प्रतिष्ठेच्या उत्तरप्रदेश निवडणुकीत वोट कटवा

    विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या या विलांबामागे निवडणुका लांबवण्याचा डाव आहे असा आरोप केला आहे. २०१७मध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे नगरविकास विभागाचा उपयोग करत शिवसेनेला शह देण्यासाठी दोन नंबरचा पक्ष म्हणून मजल मारली होती त्याच प्रकारे यावेळी सत्तेवर नसलेल्या भाजपला दुहेरी धोबीपछाड देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत वोट कटवा म्हणून सर्व जागा लढण्याची शिवसेनेची रण निती आहे. मात्र त्याच दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलून भाजपला खिंडीत गाठण्याचा शिवसेनेचा मनसुबा असल्याचे सांगण्यात येत आहे.