इतकं सगळं होऊनही मुख्यमंत्र्यांची अळीमिळी गूपचिळी, भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी

राज्यपालांची(devendra fadanvis reaction about chief minister) भेट घेवून आल्यानंतर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(BJP delegation meeting Governor) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सचिन वाझे, सनदी पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर केलेले आरोप, राज्यात पोलिसांच्या बदल्यांबाबत ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी तपास करून केलेले बदल्यांच्या रॅकेटचा भांडाफोड इत्यादी घटनांवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

  मुंबई :  भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागणी केली की, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना आणि कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबत उपाययोजना करण्यात राज्य सरकारला आलेले अपयश याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी.

  भाजपचे शिष्टमंडळ राजभवनात सकाळी साडे नऊ वाजता दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते होते. तासाभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची चर्चा सुरु होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

  सरकारकडून प्रतिक्रिया का नाही?

  राजभवन येथे राज्यपालांची भेट घेवून आल्यानंतर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सचिन वाझे, सनदी पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर केलेले आरोप, राज्यात पोलिसांच्या बदल्यांबाबत ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी तपास करून केलेले बदल्यांच्या रॅकेटचा भांडाफोड इत्यादी घटनांवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या घटना जितक्या धक्कादायक आहेत त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री आणि सरकारचे या विषयावरचे मौन अधिक गंभीर आणि धक्कादायक आहे असे ते म्हणाले.

  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या काही दिवसांत ज्या घटना समोर येतात, त्या अत्यंत चिंताजनक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंताजनक आहे. जर मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे.

  आघाडी सरकारची नैतिकता पायदळी

  फडणवीस म्हणाले की, गेल्या काही दिवसात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतात. त्या अत्यंत चिंताजनक आहेत. या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे त्याहून चिंताजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या मात्र त्यांत गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम झाले. अन्य घटकपक्ष काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगळे बोलतात, असेही फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चालले आहे. त्या पलीकडे काहीही नाही. काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे देखील त्यांनी सांगावे.

  शंभर घटना
  यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांतील शंभर घटना आहेत ज्या राज्यपालांना  निवेदनात दिल्या आहेत. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी  त्याबाबत त्यांना बोलते करावे असे ते म्हणाले. गृहमंत्र्यावर खंडणीच्या आरोपानंतर या घटनेत सरकारने काय कारवाई केली? राज्यात कोरोनाचा कहर झाला असताना अन्य राज्यात मात्र आटोक्यात आला आहे. त्याबाबत काय उपाय योजना केल्या आहेत? राज्यातील दलित शोषित समाजासाठी सरकारने कोणत्या योजना  कोरोनाच्या काळात मदत देण्यासाठी राबविल्या आहेत याची देखील माहिती या बाबतच्या अहवालात राज्यपालांनी घ्यावी अशी मागणी  केल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

  लवंगी होता, तर का घाबरले ?
  यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना फडणवीस म्हणाले की, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता त्यावर फडणवीस म्हणाले  की, मोठा बॉम्ब आहे की नाही हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?  मग २५ ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला, असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

  फडणवीस पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे. पण त्यांना माहिती आहे की यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकारी व्यक्ती नाहीत. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत .

  फडणवीस म्हणाले की, जर कोणत्या अधिकाऱ्याने खरे सांगितले तर तो भाजपचा एजंट ठरतो आणि जर हफ्ता वसूली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.