देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली भाजप पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान, ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

    मुंबई : भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान, ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

    दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय बंगल्यावर ही बैठक होणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना या तातडीच्या बैठकीला बोलविण्यात आले आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात ही बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे.

    भाजपच्या या बैठकीत मराठवाडा, विदर्भातील नुकसानीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यासह देगलूर विधानसभा क्षेत्रातील काही भाजप पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.